नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राम मध्ये सोमवारी एका महिलेचा मृतदेह एका बेवारस सुटकेसमध्ये आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . मृतदेह पाहून महिलेची निर्घृण हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. आता महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून मारेकऱ्याचीही ओळख पटली आहे.
सविस्तर वृत्त : .
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका असे मृत महिलेचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील रहिवासी होती. ती पती आणि मुलासोबत गुरुग्रामच्या सहरौल गावात भाड्याने राहत होती.आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून महिलेचा पती राहुल असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. डीसीपी पश्चिम दीपक सहारन यांनी सांगितले की, महिलेची इतर ठिकाणी हत्या करण्यात आली होती आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका सुटकेसमध्ये बंद करून इफको चौकाजवळील झुडपात फेकून दिला होता.
सुरुवातीच्या चौकशीतच या घटनेचा त्याने खुलासा केला. त्याने सांगितले की, माझी पत्नी कधी टीव्ही आणि कधी मोबाईल फोनची मागणी करत असे. माझा पगार जेमतेम 12 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत मी तिची मागणी कशी पूर्ण करणार. त्यामुळेच मी तिला मारले.
हरियाणातील गुरुग्राम मधील इफको चौकाजवळ दुपारी चारच्या सुमारास रस्त्याच्या कडेला झुडपात संशयास्पद सुटकेस एका रिक्षा चालकाच्या नजरेस पडली पडलेली दिसली. लागलीच त्याने हि माहिती पोलिसांना दिली . त्यानंतर एफएसएल आणि गुन्हे पथकाने तपास सुरू केला . महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले असता हत्येपूर्वी महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. महिलेच्या अंगावर टॅटू ओरखडे असून अत्याचाराच्या व भाजल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. तसेच, गळा आवळून खून केला होता. याशिवाय महिलेच्या प्रायव्हेट पार्टवरही जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत.