शेअर चॅट व्हिडीओ टास्क पूर्ण करण्याचे आमिष नडले, सायबर ठगांनी घातला इतकया लाखाचा गंडा

जळगाव:  सायबर ठगांनी महिलेस व्हिडीओ टास्क पूर्ण करण्याचे सांगून भरपूर नफा कमविण्याचा बहाणा बनवला. वेळोवेळी – महिलेशी संपर्क साधत भन्नाट फायद्याचा वायदा दिला. – त्यानंतर महिलेला वेळोवेळी तब्बल १२ लाख ७२ हजार ४२३ रुपयांना चंदन लावले. – याप्रकरणी धुळे येथील ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली. त्यानुसार गुरुवार १ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

धुळे येथे जमनागिरी रोडवर ४० वर्षीय महिला वास्तव्यास असून नोकरी करते. या महिलेशी १६ जानेवारी २०१४ पासून – आजपावेतो संशयित राजा ठाकूर, पट्टेश रिमाह, कुशल, ज्योती, चंदेर या अनोळखी सायबर ठगांनी व्हॉटसअॅप व टेलिग्राम सोशल मीडियावरुन संपर्क साधला फायद्याचा केला वायदा ऑनलाईन कामकाजाचे सुरुवातीला ठगांनी महिलेस सांगितले. तुम्हाला फक्त शेअर चॅटवरील व्हिडीओ बघायचा आणि टास्क पूर्ण करावयाचा आहे.

त्यानंतर गुंतवणुकीतून फायदाच फायदा होईल, असा खोटा बनाव केला. हा टास्क पूर्ण करण्यासाठी महिलेकडून वेळोवेळी १३ लाख ४० हजार ५५० रुपये रक्कम ऑनलाईन ठगांनी स्विकारली. अधिक विश्वास प्राप्त करण्यासाठी महिलेस ६८ हजार १२७ रुपये परत केले. त्यानंतर ठगांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्याने महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. गुन्ह्याचा तपास पो.नि. शिल्पा पाटील करीत आहेत.