अमेरिकी फेडरल रिझव्र्हने व्याजदरात कोणतीही वाढ न केल्याने आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजाराचा गुरुवारी नूरच पालटला. अतिशय सकारात्मक वातावरणात शेअर बाजारात चैतन्य सळसळले आणि निर्देशांक, निफ्टीने नवे उच्चांक प्रस्थापित केले.जागतिक स्तरावरील सकारात्मकतेने शेअर्स खरेदीचा सपाटा वाढल्याने बाजारातील भांडवल ३५५ लाख कोटींवर पोहोचले. सहाजिकच याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला.
गुरुवारी दिवसभरातील कारभारात गुंतवणूकदारांनी ३.८३ लाख कोटी कमावले. व्यवहारादरम्यान निर्देशांकाने ७०,४४९.८२ चा आणि निफ्टीने २१,१६१.५५ चा सर्वकालीन उच्चांक गाठला. सर्वांत मोठी वाढ आयटी आणि घे बँकिंग शेअर्समध्ये दिसून आली.या वर्षात आतापर्यंत बाजारात प्रचंड वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २ जानेवारीला (बाजार १ जानेवारीला बंद होता) स सेन्सेक्स ६१,१६७ अंकांच्या पातळीवर होता, म जो आता १४ डिसेंबरला ७०,३८१ अंकांवर के पोहोचला आहे.