---Advertisement---

शेतकरी मेळाव्याला पंजाबराव डख करणार मार्गदर्शन : आ.किशोर पाटील

by team
---Advertisement---

पाचोरा : पाचोरा-भडगाव बाजार समितीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे गुरुवार, 19 रोजी आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून सकाळी अकरा वाजता पाचोरा बाजार समितीच्या आवारात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले  की,   खरीप पिक काढणीची वेळ आलेली असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन, मका कापूस पीक सुखरूप घरात येण्यासाठी असलेल्या हवामानाचा अंदाज घेऊन पंजाबराव डख हे शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार  किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सभापती गणेश भिमराव पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे,बाजार समितीच्या 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पत्रकांचे वाचन करून मंजुरी देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांचा विचार करणे हे कामकाज होणार आहे.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटी सदस्य,व्यापारी,हमाल मापाडी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती  गणेश पाटील,   व्हाईस चेअरमन पी. ए. पाटील, सचिव बी. बी. बोरुडे यांच्यासह संचालक मंडळातर्फे करण्यात आले  आहे.

बाजार समिती येथे आयोजित  पत्रकार परिषदेला सभापती गणेश पाटील,उपसभापती प्रकाश पाटील,संचालक प्रकाश तांबे,सुनील पाटील,युसूफ पटेल,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,डॉ.प्रमोद पाटील सह संचालक मंडळ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment