जळगाव : शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. हवामान खात्याने पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. अवकाळी पावसामुळे पिकं धोक्यात येण्याची शक्याता आहे
हवामान विभगाच्या अंदाजानुसार राज्यात चार मार्चपासून ते आठ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. सोबत काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. शनिवारी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री विजांच्या गटगटासह पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी धांदळ उडाली.
एकीकडे उन्हाचा पारा वाढत आहे. यामुळे उकाड्यात वाढ होत असलयाने नागरिक हैराण झाले आहे. मात्र अशातच अवकाळी पावसाचे संकट आले आहे. यामुळे ढगाळ वातावरणामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
आज म्हणजेच ५ ते ७ मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.पश्चिम चक्रवाताचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहू लागलेत.त्यामुळे गारपीट तसेच पावसाच्या सरी कोसळणार असं हवामान विभाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, विदर्भ तसेच पालघर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळू शकतो. ७ मार्च रोजी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळेल तर ८ मार्च रोजी गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आज पहाटपासून ढगाळ वातावरण असून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ढगाळ वातावरण असल्याने जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात सर्वत्र रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे.