शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुरीला मिळाला विक्रमी दर, तब्बल इतक्या रुपयांनी वाढले भाव

xr:d:DAFe8DR0y38:2610,j:940551351081547846,t:24041508

जळगाव:   शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आहे. दीड महिन्यापूर्वी १० हजार रुपये दराने विकली जात असलेल्या तुरीच्या भावात तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण आता काही ठराविकच शेतकऱ्यांकडे तुरीचा साठा आहे. त्यामुळे या वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही.

फक्त दीड महिन्यातच तीन हजार रुपयांनी तुरीचे दर वाढले आहे. तुरीचे घटलेले उत्पादन आणि आवक मंदावल्याने तुरीला मागणी वाढली तूर डाळीचे दर १९ हजार रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. त्यामुळे तुरीच्या दरातही तीन हजारांनी वाढ झाली आहे. मात्र, तूर उत्पादक शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांची तूर विक्री झाली आहे. मोजक्याच शेतकऱ्यांकडे तुरीचा साठा शिल्लक आहे. त्यांना याचा फायदा होऊ शकतो.