शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! यंदा देशभरात धो-धो पाऊस कोसळेल, मान्सूनविषयी हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी देशभरात वरुण राजा धो-धो कोसळेल, असा होण्याचा अंदाज हवामन विभागाने वर्तविला आहे. यंदा जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा राहणार असून या काळात ८७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात ५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १०४-१०६ टक्के वरुण राजा बरसणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी दिलीय. यावर्षी ८ जूनपर्यंत मान्सून येणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाळा असणार असल्याचं म्हटलं आहे. सध्याची परिस्थिती मान्सूनसाठी आशादायी असून सध्याची परिस्थिती मान्सूनच्यादृष्टीने चांगली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्यादृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी वर्तवलीय. सध्या अल निनोची परिस्थिती सध्या moderate आहे. हा प्रभाव कमी होत आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपेल, अशी माहिती एम मोहपात्रा यांनी दिलीय. भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज मे महिन्यात वर्तवला जाणार आहे. या राज्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षितः केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव. 4 राज्यांमध्ये सामान्य पाऊस अपेक्षित: छत्तीसगड, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख. 6 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षितः ओडिशा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.