अलाहाबाद मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी- शाही इदगाहच्या वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण केले जाणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय दिला. हिंदू पक्षाची याचिका स्वीकारून सर्वेक्षणासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती करण्यात येणार आहे. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल पीठाने हा निकाल देताना वक्फ बोर्डाचा युक्तिवाद फेटाळला.प्रत्यक्षात १६ नोव्हेंबर रोजी या अर्जावर सुनावणी होऊन निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या दिवशी वादग्रस्त जागेसंदर्भातील १८ पैकी १७ याचिकांवर सुनावणी झाली. या सर्व याचिका सुनावणीसाठी मथुरा जिल्हा न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या होत्या.यातील एक याचिका कोर्ट कमिशनरकडे पाठवण्याची होती. न्या. मयंक जैन यांनी एकामागून एक खटल्याची सुनावणी केली. पक्षकारांच्या वतीने अर्ज व प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. काहींनी याचिका दाखल केल्या, तर काहींनी दुरुस्तीसाठी याचिका दाखल केल्या.
काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमी वाद?
इदगाह वक्फ बोर्डाचा युक्तिवाद फेटाळला संपूर्ण वाद मथुरेतील १३.३७ एकर जमिनीचा आहे श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर सुमारे ११ एकरावर बांधले आहे. शाही ईदगाह मशीद २.३७ एकर जागेवर आहे. ईदगाह मशीद हटवून ती जमीन हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी जमिनीबाबत १९६८ मधील करार रद्द करण्याची मागणी जमिनीवर कुणाचा अधिकार? औरंगजेबाने १६७० मध्ये एका जुन्या मंदिराच्या जागी ही मशीद बांधण्यात आल्याचे मानले जाते. हे क्षेत्र नझुल जमीन म्हणजेच बिगरशेती जमीन मानली जाते. त्यावर प्रथम मराठ्यांचे व नंतर इंग्रजांचे वर्चस्व होते. १८१५ मध्ये बनारसचा राजा पाटणी मालने ही १३.३७ एकर जमीन ईस्ट इंडिया कंपनीकडून लिलावात खरेदी केली, ज्यावर ईदगाह मशीद बांधली गेली आणि ती भगवान कृष्णाची जन्मभूमी मानली जाते. राजा पटणी माल यांनी ही जमीन जुगल किशोर बिर्ला यांना विकली होती आणि ती पंडित मदन मोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भिकेन लालजी अत्रेय यांच्या नावावर नोंदवण्यात आली होती. जुगल यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी नावाचा ट्रस्ट स्थापन केला, ज्याने कटरा केशव देव मंदिराचे मालकी हक्क विकत घेतले. १९६८ मध्ये एक करार झाला. या अंतर्गत मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर आणि ईदगाह मशिदीदरम्यान भिंत बांधण्यात आली.यानंतर न्यायालयाने दिवाणी दावे आणि उत्तरे दाखल करण्यासाठी विरोधकांना वेळ दिला.एका पक्षाने मंदिराचा पौराणिक पैलू ठेवताना सांगितले की, भगवान श्रीकृष्णाच्या नातवाने मथुरेचे मंदिर बांधले होते. मंदिरासाठी जमीन दान केली. त्यामुळे जमिनीच्या मालकीचा वाद नाही. मंदिर पाडून शाही मशीद बांधण्याचा वाद आहे. या जमिनीची आजही महसूल अभिलेखात कटरा केशव देव यांच्या नावावर नोंद आहे.