---Advertisement---

श्रीराम नवमीनिमित्ताने शिरसोली येथे आरोग्य तपासणी शिबीर

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह जळगाव । श्रीराम नवमीनिमित्ताने जय बजरंग नवदुर्गा उत्सव मित्र मंडळ व झेप प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिरसोली प्र.न.येथे रक्तदान शिबिर व महिलांसाठी रक्तगट/हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

जळगाव शहरासह परिसरात गुरुवार दि. ३० मार्च रोजी श्रीराम नवमी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर जय बजरंग नवदुर्गा उत्सव मित्र मंडळ व झेप प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिरसोली प्र.न.येथे रक्तदान शिबिर व महिलांसाठी रक्तगट/हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात १८ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तसेच या आरोग्य शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यश्वीतेसाठी जय बजरंग नवदुर्गा उत्सव मित्र मंडळ अशोक नगर व झेप प्रतिष्ठान तर्फे शिरसोली प्र.न.मनोज लोहार, रवि पाटील, कुंदन महाजन, उमेश महाजन झेप प्रतिष्ठानचे सचिव अविनाश पाटील, सचिन लोखंडे आदींनी कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment