श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाच्या कारभाराविरोधात बेमुदत उपोषण

जळगाव : येथील श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाचे नविन अध्यक्ष व नविन कार्यकारीणी गठीत करण्यात यावी  व स्वयं घोषित अध्यक्ष, सचिव. खजिनदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रुले यांनी शनिवार. २१ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे.

प्रमोद रुले यांनी श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळात घराणे शाही सुरु असून मंडळाच्या हिशोबात घोळ करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. तसेच १९६४ पासून २०२४ पर्यंत या मंडळचा चेंजरिपोर्ट तयार करण्यात आला नाही. म.न.पा.बिल्डींग बांधकाम परमिशन काढण्यात आली नाही आहे. २४ लाखाचा हिशोब एकाच पानावर देण्यात आला व अध्यक्ष-सचिव-खजिनदार या हिशोबाच्या पानावर सही व मंडळाचे सहीशिक्के व ऑडिटरचे सही-शिक्के नाहीत.गेल्या मागिल १६ वर्षा पासून अध्यक्षाची निवड होत नाही आहेत. आपल्या गोरगरिब समाज बांधवांना अल्प दरामध्ये हॉल उपलब्ध झाला पाहिजे आदी मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला स्वातंत्र्य चौकातील मंडळाच्या हॉल समोर प्रारंभ केला आहे. त्यांच्या उपोषणाला निलेश सोनवणे, प्रदीप अहिरे, अमोल जाधव, श्रीराम सुतार, हेमंत भालेराव, संजय सोनवणे, जितेंद्र सोनवणे, विजय जाधव, दत्तात्रय सोनवणे, राजेंद्र रुले, पंकज सोनवणे, रमेश सोनवणे, राजेंद्र पंडित रुले आदींनी पाठिंबा दिला आहे.