श्रेयस अय्यर सोबत गौतम गंभीरही परतला केकेआरच्या संघात

कोलकाता, १४ डिसेंबर दुखापतीमुळे गत आयपीएल हंगामाला मुकणारा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यंदाच्या आयपीएल-२०२४च्या हंगामासाठी पुन्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी परतला आहे. अशी घोषणा गुरुवारी केकेआरने केली आहे. २०२३ च्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआर संघाचे नेतृत्व करणारा नितीश राणाने केले होते. यावर्षी एप्रिलमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झालेल्या अय्यरचे या वर्षाच्या सुरुवातीला आशिया चषकासाठी राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले.

त्यानंतर झालेल्या वन-डे विश्वचषक स्पर्धेतही तो उत्तम फॉर्मात होता.दुखापतीमुळे श्रेयस आयपीएल २०२३ ला मुकला, हे खरोखरच दुर्दैवी होते. तो परत आला आहे व कर्णधार म्हणून आम्हाला आनंद झाला आहे. त्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने ज्याप्रकारे कठोर परिश्रम केले आहेत आणि त्याने दाखवलेला फॉर्म त्याच्याव गुणवैशिष्ट्याचा पुरावा आहे, असे केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी म्हटले आहे. गत हंगामात नितीशने श्रेयसच्या जागी कर्णधारपद सांभाळण्याची जबाबदारी उचलली होती आणि उत्तम कामगिरी केली याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. उपकर्णधार म्हणून नितीश टीम केकेआरच्या फायद्यासाठी श्रेयसला शक्य तितक्या सर्व प्रकारे पाठिंबा देईल यात शंका नाही, असेही ते म्हणाले. राणाच्या योगदानाबद्दल बोलताना अय्यर म्हणाला, माझा विश्वास आहे की गत हंगामात दुखापतीमुळे माझ्या अनुपस्थितीसह अनेक आव्हाने आमच्यासमोर होती.

नितीशने केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर त्याच्या प्रशंसनीय नेतृत्वाने उत्तम कामगिरी केली.गौतम गंभीरही संघात परतला दुसरीकडे, येत्या हंगामात भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर केकेआरचा मार्गदर्शक असेल. यापूर्वी तो लखनौ सुपर जायण्ट्स संघाच्या मार्गदर्शकची भूमिका बजावत होता. आयपीएल २०२३ च्या समारोपानंतर गौतम गंभीरने शाहरुख खानची भेट घेतली होती, तेव्हापासूनच गंभीर आयपीएल २०२४ साठी कोलकाता संघात सामील होऊ शकतो, अशा चर्चा सुरू होत्या. गौतमने यापूर्वीही केकेआरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. गौतमच्या कोलकाताने आयपीएलचं नेतृत्त्वात एकदा जेतेपद पटकावले आहे. केकेआरने त्याला उपकर्णधारपद दिल्यामुळे मला आनंद झाला आहे. हे नेतृत्व गट मजबूत करेल यात शंका नाही, असे अय्यर नितिशच्या योगदानाबद्दल म्हणाला.