संघाचे सेवाकार्य-समाजाला प्रेरणादायी

धरणगाव :  समाज व्यवस्थेत रा.स्व. संघाने आपल्या विविध सेवाभावी प्रकल्पातून  चालविलेले विविध कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन रा.स्व. संघाचे जळगाव विभाग संघचालक राजेश नामदेवराव पाटील यांनी एका  कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. नुकत्याच येथील क्रांतीकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित कै. डॉ.टी.डी. कुडे आरोग्य सेवा केंद्र व स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्र व अभ्यासिका यांचा  उद्घाटनचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. व्यासपिठावर संघाचे देवगिरी प्रांत  कल्याण आश्रमचे अध्यक्ष चैत्राम पवार, जिल्हा सेवा मंडळाचे सदस्य डॉ.चेतन भावसार, संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, तालुका संघचालक  मोहन चौधरी आदी उपस्थित होते .

प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आरोग्य सेवा केंद्राचे व बालसंस्कार अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले व प्रमुख मान्यवराचा संस्थेचा वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविकात संस्थेचे सचिव विलास महाजन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. रा.स्व. संघाचा माध्यमातून उभारलेल्या सेवा प्रकल्पाची माहिती देऊन प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला कार्यकमप्रसंगी चैत्राम पवार यांनी संघकार्याची माहीती देताना संघाने सेवा भावनेतून चालविलेल्या विविध कार्यामुळे संघ सर्व समाजापर्यंत पोहचत असून संघाचे संघटन  दिवसेंदिवस वाढत असल्याची  जाणीव  करून दिली.

सूत्रसंचालन ललीत उपासनी यांनी केले, तर आभार वाय.पी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमात सेवा कार्यात सहभागी झालेल्या विविध दात्यांचा व सेवा केंद्रासाठी भरीव मदत केलेल्या दात्यांचा गौरव करण्यात आला. त्यात प्रवीण कुडे, कैलास माळी, पप्पु भावे, आर्किटेक्ट सुनिल शहा यांचा समावेश होता.कार्यक्रमप्रसंगी समरसता मंच गतिविधीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर.एन. महाजन, पश्चिम क्षेत्र कार्यवाह रा.स्व. संघ बालुअण्णा चौधरी. डी.आर.पाटील, किशोर चौधरी, उद्योजक नयन गुजराथी, डॉक्टर असो. अध्यक्ष मिलिंद डहाळे, डॉ.अरुण कुळकर्णी,  डॉ.किशोर भावे, डॉ.पंकज अमृतकर, डॉ.गणेश माळी, डॉ. पुष्कर महाजन, डॉ. सुचित जैन, डॉ. शैलेद्र सूर्यवंशी, सर्व मेडीकल प्रतिनिधी,  बाजार समितीचे उपसभापती संजय पवार, वराड संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, उपाध्यक्ष यशवंत कुवर, सदस्य संजय यादव सोनवणे, शिवदास भिल, सुखदेव सोनवणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमात वैजापूर, ता.चोपडा येथील सरपंच दत्तरसिंग सुभाष पावरा यांचा सत्कार करण्यात आला. वैजापूर येथे ग्रामसभा घेऊन धर्मांतरीत आदिवासींना मूळ धर्माच्या सवलती घेता येणार नाहीत, असा ठराव मंजूर केला. याप्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्व स्वयंसेवकांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.