जळगाव : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान डी.बी.टी व्दारे करणेकरिता दि. 7 फेब्रुवारी, 2024 रोजी मा. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली झालेली व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 तसेच दिनांक 15 मार्च, 2024 व 31 मे, 2024 रोजी सदर विषयी श्रावणबाळ/ संजय गांधी योजनेचे अनुदान डी.बी.टी.व्दारे करणेकरीता आवश्यक कार्यवाही करणेबाबत जिल्हास्तरावर बैठक घेण्यात आलेली आहे.
एप्रिल 2024 पासून लाभार्थ्यांना अनुदान हे डी. बी. टी व्दारे वितरीत करणेबाबत शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थ्यांनी संबंधीत तलाठी यांच्याकडे आधारकार्ड, बँक पासबुक, लाभार्थ्याचा मोबाईल नंबर, योजनेचा प्रकार , जात प्रवर्ग, दिव्यांगाचा प्रकार व दिव्यांग टक्केवारी, उत्पन्न प्रमाणपत्र, राशन कार्ड, लाभार्थ्याच्या आधारला व बँकेस लिंक असलेला मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे 31 मे, 2024 पर्यंत दाखल करावी. जे लाभार्थी सदरील कागदपत्रे सादर करणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी यांची राहील याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी , तरी जळगाव जिल्हयातील विशेष सहाय्य् योजना लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, डी. बी. टी साठी आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित तहसिल कार्यालयांकडे जमा करण्यात येवून सर्व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार संजय गांधी योजना जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.