संजय राऊतांना ‘ट्रन्झिट’ जमानत नामंजूर

उमरखेड :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतखासदार संजय राऊत यांनी ‘सामना’या वृत्तपत्रातून प्रक्षोभक देशविरोधीविधान केले होते. यानंतर भारतीय जनता पार्टीच जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी ११ डिसेंबरला राऊतांविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर राऊतांनी पुसद जिल्हा वसत्र न्यायालयात अटकपूर्व जमानत मि ळण्यासाठी अर्ज केला होता.तपासादरम्यान हा गुन्हा दादर पश्चिम मुंबई पोलिस ठाण्यात वर्ग करणे आणि देशद्रोहाचे कलम वगळण्याबाबत राऊतांच्या वतीने पुसद न्यायालयात अर्ज करण्यात आला होता.

हा गुन्हादादर पश्चिम येथे वर्ग केल्याने राऊतांनी ट्रन्झिट जमानतीसाठी अर्ज केला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश नीता मखरे यांनी खा. राऊतांचा ‘ट्रन्झिट बेल’चा अर्ज नामंजूर केला आहे. या अर्जावर सरकारी पक्षाद्वारे अॅड. मनोज काळेश्वरकर यांनी आक्षेप दाखल केला. तसेच तक्रारदार भुतडा यांच्या वतीने अॅड. आदित्य माने यांनीही आक्षेप दाखल केला. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करून सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले होते.