jalgaon Crime News : भीक मागण्यासाठी सुभाष चौक परिसरात बसलेल्या एका बारा वर्षीय गतीमंद बालिकेला बोलावून तिला दुचाकीवर बसविले. राष्ट्रीय महामागविर दुरदर्शन टॉवरजवळील एका शेतात तिच्यावर जबरीने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना शुक्रवार ५ रोजी घडली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात वसीमखान कय्युमखान (२५) ममुराबाद पटेलवाडा असोदा रोड याला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. ७ रोजी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बालिकेला शहरातून नेले शेतात ही बालिका तिच्या आत्यासोबत भीक मागून उदरनिर्वाह करते. शुक्रवारी ती भीक मागण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बसली होती. संशयित वसीमखान हा दुचाकी क्रमांक एम.एच.१९ ईएच ५४३१ ने आला. त्याने बालिकेला बोलविले. तिला दुचाकीवर बसवून दुरदर्शन टॉवर जवळील एका शेतात तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर त्याने पीडित बालिकेला शहरात सोडून देत पसार झाला.
बालिकेने आपबिती तिच्या आत्याजवळ सांगितली. याप्रकरणी तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल झाला. प्रकार कळताच उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी घटनास्थळासह सुभाष चौकात जावून माहिती घेतली. तपासचक्रे फिरवित पोलिसांनी संशयित वसीमखान याला रविवार ७ रोजी रात्री १.२१ वाजता अटक केली. वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयात हजर केले. या कटात त्याला कोणी मदत केली. गुन्ह्यातील दुचाकी याबाबत तपासासाठी पोलीस कोठडी मिळण्याची विनंती केली. सरकारी वकील अॅड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.