---Advertisement---

संतापजनक! वृद्धेचा विनयभंग

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । एरंडोल शहरातील रहिवासी असलेल्या वृद्धेला जातीवाचक शिविगाळ करीत विनयभंग तसेच मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रानुसार, संशयीत उत्तम शिवराम शिरवाणी याच्याकडे 65 वर्षीय वृद्धेने घराची चाबी मागितली असता त्यावरून त्याने लाथा-बुक्क्याने मारहाण केली तसेच पीडीतेने विरोध केल्यानंतर हात धरून तिच्या मनास लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य केले.

याप्रकरणी संशयीत उत्तम शिवराम शिरवाणी याच्याविरुद्ध एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment