मुंबईराष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आझाद मैदानावर पोहचून तिथे पाहणी केली. उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्चा हा मुंबईत दाखल होणार आहे. दरम्यान आझाद मैदानावर मराठा मनोज जरांगे यांच्याकडून आझाद मैदानावर परवनागी मागण्यात आली होती. परंतु ती परवानगी पोलिसांनी नाकारली. याच दरम्यान रोहित पवार यांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. हे युवावर्गाचं आंदोलन असून त्यांना कोणाही आझाद मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
मनोज जरांगे म्हणाले
आम्ही आतापर्यंत लोणावळ्यात थांबलो आहोत. कारण आम्हाला मार्ग काढायचा आहे, पण आम्हाला आरक्षण हवं आहे. कुठेही मार्ग निघो म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आम्हाला आरक्षण मिळणार आहे, मिळाल्यावर गावाकडे जाऊ. आम्हाला तिकडे मुंबईत जाण्याची हौस नाही. पण मराठा समाजाला आरक्षण हवं. दीड दिवसापूर्वी तेच सांगितलं, आठ दिवसापूर्वी तेच सांगितलं. पण तुम्ही शिष्टमंडळ पाठवा किंवा काहीही चर्चा करा, पण आम्हाला आरक्षण हवंच आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, आम्ही तोपर्यंत मुंबईकडे जातो.