संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित 100 हून अधिक विरोधी खासदारांचे निलंबन मागे. वाचा सविस्तर

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.

विरोधी खासदारांना निलंबित का करण्यात आले होते ?
संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली होती.दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बसण्याच्या जागेवर उड्या मारल्या होत्या. यादरम्यान दोघांनी कॅनमधून धूर पसरवत घोषणाबाजी केली होती.काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणी लोकसभा आणि राज्यसभेत निवेदन देण्याची मागणी केली होती. यावरून संसदेत गदारोळ झाला आणि 100 हून अधिक विरोधी खासदारांना सभागृहाचा अवमान केल्याबद्दल निलंबित करण्यात आले.

३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “सर्व खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येईल.” ही स्थगिती हिवाळी अधिवेशनापर्यंतच असली तरी काही लोकांची प्रकरणे विशेषाधिकार समितीकडे गेली होती. ते पुढे म्हणाले, “आम्ही स्पीकर ओम बिर्ला आणि सरकारचे अध्यक्ष यांना खासदारांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे, कारण हे आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. दोघांनीही ते मान्य केले आहे.