बंगळूर : लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि समाजाची संस्कृती बदलण्यासाठी य कार कलेचा 202 केला वापर जात आहे. कलेच्या माध्यमातून समाजाची संस्कृती बदलण्याच्या प्रयत्नांना सामोरे जाण्यासाठी संस्कार भारतीने तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
संस्कार भारतीतर्फे आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बंगळुरू येथे आयोजित अखिल भारतीय कला साधक संगम कार्यक्रमात भरतमुनी सन्मान कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी भारत आपला स्वाभिमान शोधण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संस्कार भारतीला आपली संस्कृती विकसित करण्यासाठी कलाकारांची आवश्यकता असेल. जागतिक संस्कृतीला दिशा देणारा कलाकारांचा समूह असावा. त्यामुळे देशस्वत…ची ओळख निर्माण करेल, असे भाकीत करून सरसंघचालक म्हणाले की, अयोध्येत नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेने भारताचे स्वत्व परत.
आले आहे. यावेळी महाभारत फेम नितीश भारद्वाज आणि त्यांच्या कलावंतांद्वारे समानतेवर भरदेणारी ‘कृष्णा कहे’ ही लघुनाटिका सादरकरण्यात आली. यानंतर रामायणातील मैत्रीआणि सामाजिक सम रसता निर्माण करणाऱ्याछाऊ नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. भरतमुनी पुरस्कार प्रदान यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्रसिद्ध लोककलावंत गणपत सखाराम मसगे आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांसाठी प्रसिद्ध असलेले विजय दशरथ आचरेकर यांना भरतमुनी सन्मान प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र आणि १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.