जामनेर: सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जामनेरच्या एसआरपीएफ (SRPF) जवानाने राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली.
मिळलेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकर यांच्या कडे सुरक्षा रक्षक राहिलेल्या,एस आर पी एफ जवान प्रकाश कापडे यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.
कापडे हे गेली आठ दिवस पासून मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. गेली पंधरा वर्षा पासून ते एस आर पी एफ मध्ये कार्यरत होते.आज पहाटे त्यांनी ही आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही,त्याचा पोलिस तपास करत आहेत.