सणासुदीच्या काळात महावितरणचा राज्यातील जनतेला वीजदरवाढीचा ‘शॉक’

तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। एकीकडे नागरिक महागाईने होरपळून निघत असतानाच महावितरनाणे  ऐन सणासुदीत राज्यातील नागरिकांना वीजदरवाढीचा मोठा ‘शॉक’ दिला आहे. घरगुती ग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रति युनिट ३५ पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.

महावितरणचे मुख्य अभियंता यांनी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनी सप्टेंबरमध्ये वापरलेल्या विजेवर इंधन समायोजन शुल्क वसूल करीत आहे. ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरूच राहणार आहे. कंपनीच्या आदेशाचा परिणाम बीपीएल श्रेणीतील ग्राहकांवरही होणार आहे. यासोबतच कृषी जोडणीसाठी प्रति युनिट १० आणि १५ पैसे तसेच उद्योगांना प्रति युनिट २० पैसे जास्त द्यावे लागतील.अतिरिक्त वीज खरेदी. महावितरणला मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात अल्पकालीन करार आणि पॉवर एक्सचेंजद्वारे १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली.

घरगुती ग्राहकांवर काय परिणाम होणार?

श्रेणी अतिरिक्त शुल्क(युनिट) (प्रति युनिट/पैसे)बीपीएल ५१ ते १०० १५ १०१ ते ३०० २५ ३०१ ते ५०० ३५५००च्या वर ३५. महावितरणला मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात अल्पकालीन करार आणि पॉवर एक्सचेंजद्वारे १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली.