सप्टेंबरमध्येच जळगावकरांना ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान असं असेल हवामान

जळगाव । गेल्या काही दिवसापासून पाऊस सुट्टीवर गेला असून दुसरीकडे पावसाने उसंती घेताच तापमानात वाढ झाली. सध्या जळगावचे तापमान ३५ अंशापर्यंत गेल्याने जळगावकरांना सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसताना दिसत आहे. मात्र जळगावकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्याला देखील २३ आणि २४ सप्टेंबर रोजी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला होता. परंतु सध्या पितृपक्ष सुरू असून यात तापमान वाढले. यामुळे पावसाच्या धारा ऐवजी अंगातून घामाच्या धारा वाहत आहे. सध्या जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत असून मात्र ढगाळ वातावरण असूनही उष्णता जाणवत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान ३५ ते ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून यामुळे जळगावकरांना आणखी ऑक्टोबर हीटचा तडाखा बसणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात काही प्रमाणात गारवा असेल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान ३५ ते ३६ अंशांपर्यंत गेल्याने जळगावकरांना ऑक्टोबर हीटचा तडाखा बसणार आहे. ऑक्टोबर महिन्यात तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचेल. ऑक्टोबरच्या शेवटी थंडीला सुरुवात होईल आणि पुन्हा हळूहळू तापमान घसरायला सुरुवात होईल. नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवामान ढगाळ आहे. आज सोमवारी मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली