Maratha Reservation : प्रकाश आंबेडकर यांनी, मनोज जरांगे यांना आरक्षणचा मुद्दा पूर्ण करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे पण यावर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या आरक्षण ज्वलंत मुद्दा असताना राजकीय निर्णय नको. माझा तो मार्ग नाही.
मनोज जरांगे यांनी आधी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण नाकारले होते. जरांगे पाटील सरकारसोबत तडजोडीला तयार झाले आहेत पण त्यांनी एक अट टाकली आहे. ज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी ‘एससीबीसी’ आरक्षण दिले आहे.परंतु हे दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या आत घेतले पाहिजे, अशी अट मनोज जरांगे यांनी घातली आहे. आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही. त्यासाठी आम्ही बोलत नाही. परंतु ओबीसीमध्ये जे फायदे आहेत, ते आम्हाला मिळाले पाहिजे. असं जरांगे यांनी म्हटलं आहे.