सरकारी कंपन्यांच्या ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांची नफा वसुली

PSU स्टॉक क्रॅश: आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. रेल्वे, संरक्षण, पॉवर आणि सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली आहे. आजच्या सत्रात भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 6 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीत सरकारी कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा मोठा वाटा आहे. बीएसई मार्केट कॅप 380.63 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे जे मागील सत्रात 286.43 लाख कोटी रुपये होते.

रेल्वे – संरक्षण समभागांमध्ये नफा वसुली
रेल्वे क्षेत्राशी संबंधित समभागांबद्दल बोलायचे झाल्यास, IRFC 10 टक्के, रेल विकास निगम लिमिटेड 8 टक्के, IRCTC 2.40 टक्के, RITES 7.20 टक्के, BEML 8.10 टक्के, RailTel 4 टक्क्यांनी घसरत आहे. संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्येही मोठी घसरण झाली आहे. ज्यामध्ये भारत डायनॅमिक्स 11 टक्के, कोचीन शिपयार्ड 7 टक्के, हिंदुस्थान एरोनॉटिक्स 3.01 टक्के घसरणीसह व्यापार करत आहे.

सरकारी बँकांच्या स्टॉकमध्येही घसरण
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये गेल्या अनेक सत्रांपासून सातत्याने वाढ झाल्यानंतर आता या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. इंडियन ओव्हरसीज बँक ८.५५ टक्के, सेंट्रल बँक ७.८७ टक्के, पंजाब अँड सिंध बँक ७.१३ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ६.७४ टक्के, युको बँक ५.८६ टक्के, इंडियन बँक ५.१३ टक्के, युनियन बँक ४.६४ टक्के घसरण झाली आहे.

पॉवर सेक्टर मध्येही नफा वसुली
पॉवर सेक्टरमधील सरकारी शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा वसुली केली आहे.SJVN 20 टक्के, NHPC 9.30 टक्के, REC 4 टक्के आणि IREDA 5 टक्के घसरणीसह व्यापार करत आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण सुरू आहे. बीपीसीएल २०९२ टक्क्यांनी, आयओसी २.३३ टक्क्यांनी, एचपीसीएल १.२५ टक्क्यांनी, ओएनजीसी २ टक्क्यांनी आणि इंजिनिअर्स इंडिया ९ टक्क्यांनी घसरले आहे.