जामनेर ः शेताजवळील नाल्यात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या 40 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात 40 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गुरुवार, 7 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महिला शेताजवळील नाल्यात काडीकचरा जमा करत असताना संशयित विष्णू पुनमचंद राठोड याने महिलेचे तोंड दाबून नाल्यातच अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडितेने पहूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे करीत आहे.
---Advertisement---