सर्वत्र विखुरलेले मृतदेह, ट्रक-टेम्पोच्या धडकेत 12 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ट्रक आणि टेम्पोची धडक झाली. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर सर्वत्र मृतदेह विखुरले होते. हे दृश्य पाहून सर्वांचाच आत्मा हादरला. या अपघातात काही जण गंभीर जखमीही झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारा ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. टेम्पोमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. सेहरा मऊ दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.