सर्वसामान्यांना झटका! सरकारच्या या निर्णयामुळे खाद्यतेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागले..

Pouring food oil in hot pan for deep frying.

जळगाव । देशात तेलबियांच्या घसरत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिमाण खाद्य तेलाच्या किमतीवर झाला आहे.

एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु झाले असता त्यातच खाद्यतेल महागल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या आयात शुल्कवाढीनंतर खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलोमागे २२ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच २ ते ५ रुपयांनी महागलेले खाद्यतेल शनिवारी २२ ते २५ रुपयांनी महागले आहे.

यंदा सोयाबीन, भुईमूग, तीळसह अन्य कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र यंदा लागवडीसह अन्य खर्चाचा अंदाज बघता बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादकांनी शेतमालाची साठवण करून ठेवली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत खाद्यतेलाला महागाईची उकळी फुटली आहे.कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करत निर्यात मूल्यही हटविल्याने कांद्याच्या भावात शनिवारी वाढ झाली.

कसे आहेत दर (प्रतिकिलो)

सोयाबीन – आधी १०५.. आता १२६

पामतेल  – आधी १०४.. आता १२७

शेंगदाणा – आधी२०४.. आता २१०

सूर्यफूल – आधी १०२.. आता १२७