मुंबई : टाटा समूह भारतातील सर्वांत मोठा आयफोन असेंब्ली प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. टाटा समूहाला हा कारखाना तामिळनाडूच्या होसूरमध्ये उभारायचा आहे. बंगळुरूपासून होसूर ४० किलोमीटर अंतरावर आहे. या सुविधेत दोन वर्षांत २० असेंब्ली लाईन बांधण्यात येणार आहे. याद्वारे सुमारे ५०,००० कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार आहे. ही सुविधा १२ ते १८ महिन्यांत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. टाटा समूहाचा आधीच विस्ट्रॉन कॉर्पोरशनकडून खरेदी केलेला कारखाना आहे, ज्यात १०,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. हा कारखाना शेजारच्या कर्नाटक राज्यात आहे.