सोने- चांदी: जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असतानाही बुधवारी भारताच्या स्थानिक बाजारात सोने पुन्हा 400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. या घसरणीनंतर देशातील विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव ७३ हजार रुपयांच्या खाली आला आहे.
जळगाव सुवर्णपेठेत बुधवारी सोने २०० रुपयांनी घसरून ७२७०० रुपये तोळ्यावर आले. तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ होत ती ८५ हजारांवर पोहोचली. गेल्या गुरुवारी ७२ हजार रुपये तोळा असलेले सोने दुसऱ्या दिवशी १३०० रुपयांनी वाढले.