सस्पेन्स संपला : नितीश आणि चंद्राबाबू यांचा कोणाला पाठिंबा ? स्पष्टच सांगितले

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी एनडीएची महत्वपूर्ण बैठक होत. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे  देखील सहभागी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या दोघांनी  बैठकीत समर्थनाची पत्रे सादर केली आहेत. यापार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीनंतर सर्व नेते सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, ५ जून म्हणजेच आजच एनडीए नेते तासाभरात राष्ट्रपती भवनात जाऊ शकतात. पंतप्रधान निवासस्थानी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत औप्रिया पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पवन कल्याण, जयंत चौधरी हे देखील उपस्थित आहेत.

या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. या कारणास्तव, जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे एन चंद्राबाबू नायडू एनडीए सरकार स्थापन करण्यात किंगमेकरची भूमिका बजावत आहेत. एनडीएच्या बैठकीत प्रत्येक पैलूंवर चर्चा होत आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 कमी आहे. टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण 28 जागा आहेत. भाजपच्या इतर मित्रपक्षांसोबत मिळून एनडीए बहुमताचा आकडा पार करेल.