सायंकाळी चिमुकला खेळत होता अन् घडले असे काही…

एरंडोल :  दहा वर्षीय चिमुकल्याच्या शरीरात खेळताना गटारीवरील आसारी छातीत शिरल्याने विशाल रवींद्र भील (10, हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना शहरातील हिमालय पेट्रोल पंपामागील परीसरातील नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी सोमवार, 13 रोजी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी नातेवाईकांसह जमावाने दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत पोलिस ठाणे गाठले होते. याप्रकरणी रवींद्र सुभाष भील (33, जुना धरणगाव रस्ता, भिलाठी भाग, एरंडोल) यांच्या फिर्यादीवरून पालिका अभियंता व कंत्राटदाराविरोधात (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

विशाल रवींद्र भील (10, हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) हा चिमुकला आई, वडील, लहान भाऊ-बहिण यांच्यासह वास्तव्याला होता. एरंडोल नगरपालिकेतर्फे हिमालय पेट्रोल पंपामागे गटारीचे ढापे टाकण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र काही आसाऱ्या धोकादायक स्थितीत ठेवलेल्या असतानाच सोमवारी सायंकाळी खेळत असलेल्या विशालच्या शरीरात आसारी शिरल्याने त्याचा मृत्यू झाला.स्थानिक नागरीकांनी धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात उपचाराला नेले असता वैद्यकीयअधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. कुटुंबीयांनी मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकून आक्रोश केला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याने दोषींवर कारवाईसाठी नागरीक आक्रमक झाले होते. रात्री उशिरा मयताचे वडिल रवींद्र सुभाष भील (33, जुना धरणगाव रस्ता, भिलाठी भाग, एरंडोल) यांच्या फिर्यादीवरून संशयित तथा पालिकेचे कंत्राटदार व पालिका अभियंता (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.