तरुण भारत लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । जळगाव सहकारी संस्थांचे जिल्हा उनिबंधक संतोष बिडवई यांचा बुधवारी बळवंत पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर धोंडू पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले.
जळगाव सहकारी संस्थांचे जिल्हा उनिबंधक संतोष बिडवई यांनी जिल्ह्यातील सावकारांच्या पाशात अडकलेल्या सुमारे १७ शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा सखोलपणे अभ्यास करून सावकारांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये कारवाई करून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला. विशेष म्हणेज, समाजाप्रती आपले कर्तृत्व दाखवत महाराष्ट्राच्या सहकार विभागाच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवत आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम बजाज, संचालक संदीप अमृतलाल लाड, पवनकुमार मित्तल, सविता नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी जयदीप शाह व कर्मचारी वृंद उपस्थित होते.