---Advertisement---
Google Drive News : गुगल ने Google Drive यूजर्सना स्पॅम अटॅकच्या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. विशेषत: हा अलर्ट अशा यूजर्ससाठी आहे जे Google Drive वापरतात. या इशाऱ्यात गुगलने स्पॅमबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय आहे कारण ?
गुगल ड्राईव्हवर गुगल अकाउंट यूजर्सना एक संशयास्पद फाईल पाठवली जातेय. कंपनीचे म्हणणे आहे की जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद फाईल आढळली तर ती स्पॅम रेंजमध्ये मार्क करा. गुगलने सल्ला दिला आहे की, जर तुम्ही कोणतीही संशयास्पद फाइल स्वीकारण्यास मंजुरी दिली असेल तर त्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच, मंजूर झालेले कोणतेही कागदपत्र उघडू नका.
असा करा रिपोर्ट ?
यूजर्स त्यांना प्राप्त कोणत्याही संशयास्पद फाइल तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला रिपोर्ट ऑप्शनवर टॅप करावे लागेल. जर संगणकात फाइल उघडली असेल तर तुम्हाला फाइलवर उजवे क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला ब्लॉक किंवा रिपोर्ट या पर्यायावर टॅप करावे लागेल.