जळगाव : पति पत्नी मधे वाद हे होतच असतात पण कधी कधी हे वाद विकोपाला जातात पती-पत्नी दाम्पत्यांत वाद होता. त्यामुळे विवाहिता माहेरी आली होती. मुलाला भेटण्यास आलेल्या जावयाच्या डोक्यात सासऱ्याने कुऱ्हाडी सारख्या वस्तूने घाव घालत जखमी केले. शनिवार, 21 रोजी रात्री 8.30 वाजता कुसुंबा येथे ही घटना घडली.
जावई हे मुळ पारोळा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगा हे सासरी आले होते. मुलास भेटण्यासाठी जावई सासरी कुसुंबा येथे सासऱ्याच्या घराजवळ गेले असता सासऱ्याने मागावून येत जावयाच्या डोक्यात काही तरी वस्तू टाकत जखमी केले.
तर पत्नीचा भाऊ तसेच तिचा मामा या दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तक्रारीवरुन सासरे,शालक तसेच पत्नीचा मामा अशा विरुध्द गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवार 22 रोजी दाखल करण्यात आला. तपास पोना मुदस्सर काझी हे कर