crime news : बऱ्याचश्या घरांमध्ये सासू- सुनेचे जमत नाही. बऱ्याचदा वाद हे विकोपाला सासू-सुनेतील ‘तू तू मैं मैं’ घराघरात असते. असच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यात असाच काही सासू सुनेचा वाद झाला व सासू सुनेला नकटी बोलली, राग आल्यामुळे सुनेने जे केले ते धक्कादायक आहे. एकाच घरात राहत असल्यामुळे कधी कधी त्यांच्यात सासू-सुनेमधील भांडणासारखा प्रकार होतो.सुनेने सरळ सासूवर चाकू हल्ला केला.
हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. सासू-सुनेतील या नाट्यामुळे पुणे शहर हादरले आहे.सासूने सुनेला नकटी म्हटले…त्यानंतर सुनेला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने सासूवर चाकूने हल्ला केला. या घटनेत सासू गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पुणे शहरातील येरवडा येथील गणेश नगरमध्ये घडली. याप्रकरणी सुने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला आहे. नात्यांमध्ये कडू-गोड प्रसंग येतात, परंतु हल्ला करण्यासारख्या प्रकार संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.