मुंबई: स्थलांतरित किंवा बेघर कुटुंबीय आणि लहान मुले ही प्रसंगी उदरनिर्वाहासाठी सिग्नल, उड्डाणपुलाखाली तसेच चौक्यांच्या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करत असल्याचे आढळते. त्या अनुषंगाने समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने २०१८मध्ये ठाणे येथील तीन हात नाका येथे सिग्नल शाळा सुरू केली होती. बेघर विद्यार्थ्यांना एकत्र आणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ही संस्था काम करत आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण घेतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमाचेही शिक्षण घेतले आहे.
त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शंभर मुलांच्या शैक्षणिक व्यवस्थेची पहिली ‘सिग्नल शाळा’ उभारण्यात येणार आहे. मुंबई पूर्व उपनगरामध्ये सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल चेंबूर येथे ही शाळा साकारण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेला सुरूवात झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. अधिकाधिक अद्ययावत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या शाळांच्या माध्यमातून करण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शंभर मुलांच्या शैक्षणिक व्यवस्थेची पहिली ‘सिग्नल शाळा’ उभारण्यात येणार आहे. मुंबई पूर्व उपनगरामध्ये सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल चेंबूर येथे ही शाळा साकारण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.