भुसावळ : वरणगाव जवळील दीप नगर रेल्वेउड्डाण पुलावरील सिमेंट पोलवर भरधाव दुचाकी आदळल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिवार, १६ रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उदयसिंग शंकर पवार वय-३३, रा.खेरखेडा ता. खाकणार जि. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, उदयसिंग पवार हा तरुण त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एफ ९९०८) ने भुसावळकडून वरणगावकडे जात होता. दीपनगर येथील रेल्वेउड्डाल पुरावरून दुचाकीने जात असताना त्याची दुचाकी पुलावरील सिमेंट पोलवर आढळली. या अपघातात तरुण हा गंभीर जखमी झाला होता. त्याला भुसावळ येथील ड्रामा केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.
या अपघात प्रकरणी अखेर शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता पोलीस कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश पालवे हे करीत आहे.