Global Layoffs: जगभरातील कंपन्यांसाठी 2024 मध्ये, टाळेबंदीचा वेग लक्षणीय वाढला आहे. या प्रकरणात दिलासा मिळण्याची लक्षणे दिसत नाही, कारण दिवसेंदिवस टाळेबंदीचा सामना करणाऱ्यांच्या यादीत नवीन कंपन्यांची नावे जोडली जात आहेत. आता या यादीत आणखी एका मोठ्या कंपनीचे नाव जोडले जाणार आहे.
वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठ्या नेटवर्किंग आणि सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेली सिस्को येत्या काही दिवसांत टाळेबंदीच्या तयारीत आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या नेटवर्किंग कंपनीने टाळेबंदीची टांगती तलवार लटकवल्याने हजारो कर्मचारी बेरोजगार होण्याचा धोका आहे. मात्र, यावेळी कंपनीने किती कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले, याची अजून माहिती उपलब्ध नाही. सिस्को हे तंत्रज्ञान जगतात मोठे नाव आहे. सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे मुख्यालय असलेली ही कंपनी सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांमध्ये गणली जाते. 2022-23 आर्थिक वर्षाच्या अखेरीस, सिस्को कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 84,900 होती. आता कंपनी आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करू पाहत असल्याने हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.
पुढील आठवड्यात होऊ शकते घोषणा
मिळालेल्या माहिती नुसार सिस्को तिच्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कंपनीला अशा क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे कि ज्याच्यात चांगल्या प्रगतीची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी पुढील आठवड्यात अधिकृतपणे या लेऑफची घोषणा करू शकते. सिस्कोच्या कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 पासून सुरू असलेल्या टाळेबंदीच्या या लाटेत कंपनीने पुन्हा एकदा टाळेबंदी केली आहे. कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये कमाई कॉल दरम्यान व्यवसायाची पुनर्रचना करण्याची घोषणा देखील केली होती. त्यात कंपनीने एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.