नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 17 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने हा आदेश दिला आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात ईडीचे पाच समन्स असूनही मुख्यमंत्री केजरीवाल हजर न झाल्याच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर राऊस एव्हेन्यू न्यायालयाने आपला निकाल दिला. ACMM दिव्या मल्होत्रा यांनी हा निर्णय दिला.