Sudha Murthy In Rajya Sabha: प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधा मूर्ती यांचे अभिनंदन करत महिला शक्तीचे हे एक सशक्त उदाहरण असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचं नामांकन राज्यसभेसाठी केल्यानं मला आनंद होत आहे. सुधा मूर्ती यांचं सामाजिक कार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात योगदान मोठं आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील मूर्ती यांची उपस्थिती असणं ही आमच्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे. त्यांचा संसदेतील सहभाग हा आपल्या देशाचं नशीब घडवण्यात असलेलं महिलांच्या सामर्थ्याचं उदाहरण आहे. त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा”