नवी दिल्ली : भारतचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने नवीन व्यवसाय सुरू केला आहे.त्यांने नेदरलँडमध्ये एम्सटर्डमध्ये नवीन भारतीय रेस्टॅारंट उघडले आहे. या रेस्टॅारंटचे काही फोटो रैनाने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यामध्ये तो एक रेसिपी तयार करताना दिसत आहे. तसेच तो स्टाफसोबतही दिसत आहे. तो पत्नी प्रियंका आणि मुलांसह येथील अँस्टोरोड़ मध्ये राहतो.
सुरेश रैना काय म्हणाला
“अॅमस्टरडॅममधील रैना इंडियन रेस्टॉरंटची ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे, त्यामुळे तुम्हाला माझी खाण्याबद्दलची आणि स्वयंपाकाची आवड कळेल. गेल्या काही वर्षांत तुम्ही माझे खाण्याबद्दलचे प्रेम पाहिले आहे आणि माझ्या स्वयंपाकासंबंधी साहसांचे अनुसरण केले आहे. भारताच्या विविध भागांतून अगदी अस्सल आणि अस्सल फ्लेवर्स थेट युरोपच्या मध्यभागी आणण्याचे ध्येय आहे.
३६ वर्षीय रैना हा टॉप ऑर्डरचा आक्रमक फलंदाज आहे. त्याने भारतासाठी १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-20 सामने खेळले आणि सर्व फॉरमॅटमध्ये ७ हजार हून अधिक धावा केल्या.२००८ ते २०२१ दरम्यान तो आयपीएल स्पर्धेत खेळला. २०२० मध्ये ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि रैनाने टूर्नामेंट मध्येच सोडली आणि मायदेशी परतला. रैनाने २०५ आयपीएल सामने खेळले आहेत आणि नाबाद शतकासह ५ हजार पाचशे हून अधिक धावा ही केल्या आहेत. रैना आयपीएलमध्ये CSK आणि गुजरात लायन्सकडून खेळला आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले.