जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत असून दोन्ही धातूंच्या किमतींनी नवा उच्चांकी दर गाठला. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे. पण आज 22 मे रोजी सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोने 800 रुपयांनी घसरले. पण चांदीत पुन्हा वाढ झाली आहे.
बुधवार रोजी भाववाढ कायम राहत पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी आता ९३ हजारांच्या जवळ पोहोचली आहे.दुसरीकडे सोमवार, २० मे रोजी ७५ हजार १०० रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात मंगळवार, २१ मे रोजी ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते ७४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. दलालांनी चांदीची खरेदी वाढवल्याने तिचे भाव वाढत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.