सरकारी नोकऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात रिक्त जागा आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये सफाई कामगार आणि उप-कर्मचाऱ्यांच्या 484 रिक्त पदांवर भरती केली जात आहे. इच्छुक उमेदवार 16 जानेवारी 2024 पर्यंत Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव : सफाई कर्मचारी सह सब स्टाफ
आवश्यक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी म्हणजेच SSC किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा – किमान १८ ते कमाल २६ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ०५ वर्षे सूट आहे.)
वेतनश्रेणी – १४ हजार ५०० ते २८ हजार १४५ रुपये.
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार यांच्यासाठी १७५ रुपये.
निवड प्रक्रिया
भरती अधिसूचनेनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी पदांसाठी उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल. उमेदवारांना IBPS द्वारे आयोजित ऑनलाइन परीक्षा आणि बँकेद्वारे आयोजित स्थानिक भाषा चाचणी देखील उत्तीर्ण करावी लागेल, ज्यामध्ये भारत सरकारच्या आरक्षण धोरण आणि नियमांनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.