मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ नोंदवली गेली. यामुळे खरेदीवर सामान्यांना अधिक किंमत मोजावी लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी आज गुरुवारीही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. वर्षाच्या अखेरीस दोन्ही धातूंच्या किंमती आता यापूर्वीच्या विक्रमाला घवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. सोने आणि चांदीने यावर्षातील उच्चांकी झेप घेतली आहे.
दरम्यान 28 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 150 रुपयांनी तर चांदीचा भाव 100 रुपयांनी वाढला. यानंतर देशात सोन्याचा (22 कॅरेट) भाव विनाजीएसटी 58,621 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत विनाजीएसटी 63,950 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. तर आज चांदीचा भाव विनाजीएसटी 75,720 रुपये प्रति किलो आहे.
MCX वर सोन्या-चांदीच्या किमती
तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.18 च्या वाढीसह 63,790 रुपयांवर म्हणजेच 112 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर येथे चांदीचा भाव 0.07 टक्क्यांनी वाढून 53 रुपयांनी 75,700 रुपये प्रति किलो झाला आहे.