जळगाव । सोने चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोने चांदीने मोठी उसळी घेतली. जळगावात गेल्या दोन दिवसात सोने दरात तब्बल १२०० रुपयापर्यंतची वाढ झाली. तर चांदी दरात ६००० रुपयाची वाढ झाली
काय आहेत भाव आजचे?
शुक्रवारी चांदीच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर १ हजार रुपयांनी वाढले. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये १६०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात २०० ची दरवाढ झाली. चांदी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने २०० रुपयांनी वधारून ते ७४ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे.
सोने चांदी दरवाढीचे कारण काय?
अमेरिकन अर्थव्यवस्था अधिकच डळमळत असल्याने बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याच्या शक्यतेने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत असल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्यास सुवर्ण व्यवसायिकाचं म्हणणं आहे. या दरवाढीमुळे चांदी पावणे दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे