देशात १८ व्या लोकसभा निवडणूक मोठ्या उत्सहात पार पडत आहे. 18व्या लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात पार पडणार आहेत. आतापर्यंत चार टप्प्यात मतदान झाले असून आता सोमवार २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान आहे. मतदानामुळे देशातील अनेक भागात बँकांच्या शाखा बंद राहतील, तसेच या दिवशी शेअर बाजारही बंद राहील. सोमवार, 20 मे रोजी तुम्ही ऑनलाइन बँकिंगच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. परंतु तुम्ही बँकेच्या शाखेशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही किंवा शेअर बाजारात कोणतेही व्यवहार करू शकणार नाही.
१९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे आणि १३ मे रोजी मतदानाचे चार टप्पे पार पडले. आता 20 मे रोजी देशभरातील 49 जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. देशातील विविध भागात मतदानाच्या ठिकाणी बँकांच्या शाखा बंद आहेत. सोमवार, २० मे रोजी मतदान होणार असलेल्या जागांवर बँक शाखा बंद राहतील. याआधी आज म्हणजेच रविवारी बँका बंद आहेत. याचाच अर्थ आता मतदानाच्या ठिकाणी बँका थेट मंगळवारी उघडतील.
या शहरांमध्ये असेल बँकेला सुट्टी
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या मतदानामुळे 20 मे रोजी लखनौ, मुंबई आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहणार आहेत. मुंबईत मतदानामुळे शेअर बाजारही बंद राहणार आहे. मतदानामुळे या महिन्यात बँकांना अनेक सुट्या आल्या आहेत. या महिन्याची सुरुवात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीने झाली.
मे महिन्यात अनेक दिवस बँका बंद होत्या
8 मे रोजी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त बंगालमध्ये बँका बंद होत्या, तर 10 मे रोजी बसव जयंती/अक्षय तृतीयेमुळे कर्नाटकमध्ये बँका बंद होत्या. 13 मे रोजी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे बँक सुट्टी होती, तर 16 मे रोजी सिक्कीममध्ये राज्य दिनानिमित्त बँका बंद होत्या. याशिवाय शेवटच्या चार टप्प्यातील मतदानामुळे देशभरात अनेक ठिकाणी बँका बंद होत्या.
मे महिन्यातही बँका बंद राहतील
मे महिन्यात बँकांच्या शाखा अजूनही काही दिवस बंद राहणार आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानामुळे २० मे रोजी काही ठिकाणी बँका बंद आहेत. याशिवाय त्रिपुरा, मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, जम्मू, लखनौ, बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, श्रीनगरमध्ये गुरुवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँका बंद राहतील. 23 मे यासोबतच 25 मे रोजी नजरल जयंतीनिमित्त काही ठिकाणी बँका बंद राहतील, तर त्याच दिवशी सार्वत्रिक निवडणुका 2024 चा सहावा टप्पा होणार असल्याने त्रिपुरा आणि ओरिसामध्ये बँका बंद राहतील. 26 मे रोजी महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.