सोयगाव : शनिवार १५ जून रोजी शाळेच्या पहील्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे वर्ग पहीलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीत बसवून परीसरात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी नविन प्रवेश घेतलेल्या नवगतांचे स्वागत सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज आगे, उपाध्यक्षा वैशाली पवार, नगरसेवक गजानन कुडके, सदस्य योगेश बोखारे, सदस्या मनिषा जेठे, पालक शरद पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, संतोष इंगळे, योगेश कळवञे, विलास इंगळे, रघुनाथ इंगळे यांच्या हस्ते पुस्तके व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व योजनांविषयी मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांनी माहीती सांगून सर्वांनी आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करावा असे आवाहन पालकांना केले.
शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहील दिवस असल्याने शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांना आमसराचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीकडूून शाळेच्या दोघं शिक्षकांंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, सहशिक्षक गोपाल चौधरी,मनिषा जेठे यांनी परिश्रम घेतले.