भुसावळ ः यावल तालुक्यातील एका गावातील 40 वर्षीय शेतकरी इसमाचे सोशल नेटवर्क इंस्टाग्रामचे खाते हॅक करीत त्यावरूनच संबंधित इसमाच्या मुलीच्यासंदर्भात बदनामीकारक पोस्ट करीत बदनामी करण्यात आली. हा प्रकार 23 सप्टेंबर रोजी ते 10 ऑक्टेोबर दरम्यान घडला. 10 ऑक्टोबर रोजी हा प्रकार संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अनोळखी व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल तालुक्यातील येथील एका 40 वर्षीय शेतकऱ्याचे इंस्टाग्रामचे खाते आहे. हे सोशल नेटवर्कचे खाते कोणीतरी हॅक केले आणि या खात्यावरूनच शेतकऱ्याच्या मुलीची बदनामीकारक पोस्ट अज्ञाताने व्हायरल केली. हा प्रकार निदर्शनास येतात 40 वर्षीय शेतकऱ्याने जळगाव येथील सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.