स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींकडून मेडीकल शिक्षणासंदर्भात महत्त्वाची घोषणा

नवी दिल्ली । संपूर्ण देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना संबोधित केले. यादरम्यान मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

‘ पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत.डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं. त्यासाठी त्यांना पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. आम्ही मागच्या 10 वर्षात मेडीकल सीट वाढवून 1 लाख केल्या आहेत. त्यामुळे आता येत्या 5 वर्षांत 75,000 जागा वाढवण्यात येतील, असं सरकारनं निश्चित केल्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

2047 साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे’ असंही पीएम मोदी म्हणाले. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.