हतनूर प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले; ५५ हजारांहून अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग

जळगाव – तापी -पूर्णा नदीपाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पाऊस झाला आहे. परिणामी हतनूर प्रकल्पात पाण्याची आवक मध्ये वाढ झाल्याने प्रकल्पाचे दहा दरवाजे २ मिटरने दरवाजे मंगळवार रात्रीच्या सुमारास उघडून नदीपात्रात ५५७८९.८० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सद्यःस्थितीत हतनूर प्रकल्पाची पाणीपातळी १०० टक्के असून तापी-पूर्णा नदीपाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात १०१.८८ दलघमी पाण्याची आवक हतनूर प्रकल्पात झाली आहे. प्रकल्प सुरक्षिततेसह पाण्याची आवक लक्षात घेता हतनूर प्रकल्पाचे १० दरवाजे २ मिटरने उघडून तापी नदीपात्रात ५५७८९.८० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे प्रकल्प अभियंत्यांनी म्हटले आहे. प्रकल्पात होणारी  पाण्याची आवकेचे प्रमाण पहाता विसर्गाचाा प्रवाह कमी अथवा वाढविला जाण्याची शक्यता आहे. तापी नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात गुरे ढोरे घेउन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.